उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा; म्हणाले....

Deputy Chief Minister Ajit Pawar wishes Guru Purnima
Deputy Chief Minister Ajit Pawar wishes Guru Purnima

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला जीवनध्येय सांगणाऱ्या आणि ते गाठण्याचा मार्ग दाखवणाऱ्या सर्व  गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन असे म्हणत त्यांनी राज्यातील सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पवार म्हणाले, आपल्या राज्याला, देशाला गुरू-शिष्य परंपरेचा वैभवशाली वारसा लाभला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्यापैकी सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेली आहे. सार्वजनिक जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण खूप काही शिकत असतो. ते देखील आपले गुरुच असतात, असा संदेश देणारे ट्विट त्यांनी केले आहे.
-------------
चीनवर आता नवं संकट; तब्बल १०६ जणांचा मृत्यू
------------  
उत्तरप्रदेश, बिहारमध्ये एकाच दिवसात वीज कोसळून तब्बल ४३ जणांचा मृत्यू
------------

दरम्यान, गुरुपौर्णिमा याच पौर्णिमेला जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावासास सुरवात होते, वर्षावास काळात श्रध्दावान उपासक विहारात जावून भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करतात आणि धम्म श्रवण करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com