

Sunetra Pawar resignation
ESakal
विधानसभेवर निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची आज दिल्लीत उपराष्ट्रपती भवनात भेट घेऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. सुनेत्रा पवार या बारामती येथील विधानसभा पोटनिवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकल्या आहेत.