माळेगाव कारखान्यातील अपघाताची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल 

कल्याण पाचांगणे
Saturday, 23 May 2020

माळेगाव सहकारी साखर कारखानामध्ये घडलेल्या अपघाताची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. 

माळेगाव (पुणे) : बारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखानामध्ये घडलेल्या अपघाताची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, बारामतीतील वाबळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या जखमी कामगारांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. जखमी कामगारांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने कळवले. 

बारामतीत एसटीचे चाक लॉकडाउनमुळे रुतले, 15 कोटींचे नुकसान  

माळेगाव कारखान्यात आज एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना मिथेन गॅस तयार होऊन आठ कामगार गुदमरले होते. या कामगारांवर बारामतीतील वाबळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी खुद्द अजित पवार यांनी हॉस्पिटलला भेट दिली. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, अनिल तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव, सुरेश खलाटे, दत्तात्रेय भोसले आदी संचालक उपस्थित होते. 

सासवडकरांचे टेन्शन वाढले, शहराजवळील गावात कोरोनाचा रुग्ण  

या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे प्रमुख डॉक्‍टर राजेंद्र वाबळे यांच्याशी चर्चा केली. या वेळी अजित पवार यांनी वैद्यकीय उपचार योग्यरीत्या होण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केली. 

माळेगाव कारखान्यातील जखमी कामगारांची नावे : रामभाऊ येळे (माळेगाव), जालिंदर भोसले, शिवाजी भोसले (नीरावागज), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी), घनश्‍याम निंबाळकर (भिकोबा नगर- धुमाळवाडी), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी).  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister takes serious note of the accident at Malegaon factory