सासवडकरांचे टेन्शन वाढले, शहराजवळील गावात कोरोनाचा रुग्ण 

श्रीकृष्ण नेवसे
शनिवार, 23 मे 2020

मुंबईतून आलेले व पुण्यात जाणारे व येणारे नोकरदार, ही पुरंदरसाठी पुढील काळात मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे सुप्याच्या रुग्णामुळे स्पष्ट झाले आहे. 

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील सुपे खुर्द येथील एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुपे खुर्द गाव सासवड शहरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, या गावाचा रस्ता सासवडमधून जातो. त्यामुळे 60 हजार लोकसंख्येच्या सासवड शहरातील नागरिकांसाठी हा मोठा धोका आहे.

बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले

पुरंदर तालुक्‍यात आता कोरोनाचे तीन रुग्ण झाले आहेत. मुंबईतून आलेले व पुण्यात जाणारे व येणारे नोकरदार, ही पुरंदरसाठी पुढील काळात मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे सुप्याच्या रुग्णामुळे स्पष्ट झाले आहे. 

बारामतीतील तांदूळवाडीमध्ये सापडला कोरोनाचा रुग्ण

हडपसरलगतच्या सिरम कंपनीमधील एक व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीमधील अनेकांची कोरोना तपासणी केली. त्या तपासणीमध्ये काही लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पुरंदर तालुक्‍यातील सुपे गावातील व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. संबंधित व्यक्ती काल कंपनीमध्ये गेली होती. त्यावेळी कंपनीने त्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल केले आहे. प्रशासनामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी पुरंदर तालुक्‍यातील जनतेला आवाहन केले की, बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींनी स्वतःला होम क्वारंटाइन करावे व सहकार्य करावे. कुटुंबाने त्यांच्या संपर्कात येऊ नये. तसेच, दररोज पुणे येथे जाणाऱ्या व येणाऱ्यांनी व अत्यावश्‍यक सेवेतील लोकांनी कार्यालय व घर या शिवाय गावात इतरत्र फिरू नये. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करणे उद्यापासून सुरू करू. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient in a village near the city of Saswad