
पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत नेहमीच आमची भूमिका सकारात्मक राहिली आहे. त्यांनी जेव्हा प्रश्न मांडले, तेव्हा ते सोडविण्यावरच भर राहिला आहे. कोरोनाच्या काळात राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता. मात्र, त्या वेळीदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविला आहे. आंदोलन हा जरी मार्ग असला, तरीही तो नेहमीच वापरू नये. चर्चेच्या मार्गानेदेखील प्रश्नांवर तोडगा निघतो, यावर विश्वास ठेवावा. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठाम उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.