esakal | शशिकांत शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant_Shinde_Ajit_Pawar

कोणत्याही समाज किंवा घटकाला नोकरभरतीत वंचित ठेवले जाणार नाही अशा पध्दतीने सरकार त्यातून मार्ग काढेल, असेही पवार यांनी नमूद केले. 

शशिकांत शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांना आलेल्या ऑफर संदर्भात आपण मुंबईला गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन मगच या बाबत मत व्यक्त करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बारामतीत रविवारी (ता.२४) पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. 

आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्याला मंत्रिपद आणि शंभर कोटींची ऑफर भाजपकडून आली होती, असे विधान शनिवारी (ता.२४) केले, त्या संदर्भात पवार यांना विचारले असता, त्यांनी शशिकांत शिंदे यांच्याशी प्रजासत्ताक दिनानंतर गेल्यानंतर बोलून मगच मत व्यक्त करु असे सांगितले. 

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री या नात्याने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात भेटीला आले होते, त्यांच्या कामाबाबत मंत्रालयात बैठक लावतो असे मी त्यांना सांगितले आहे. मी विरोधात होतो तेव्हा माझ्या मतदारसंघातील कामे मी त्या वेळेसच्या राज्यकर्त्यांकडे घेऊन जात होतो, असे सांगत यात काहीही राजकारण नसल्याचेच पवार यांनी नमूद केले. 

शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले; शरद पवारांना केली विनंती​

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व पोलिस विभागात लोकांचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भरती गरजेची आहे, अनेक ठिकाणी आता लोक कामाला नाहीत, त्यामुळे कोणताही घटक नोकरीपासून वंचित राहणार नाही, यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार योग्य निर्णय घेत आहे. कोणत्याही समाज किंवा घटकाला नोकरभरतीत वंचित ठेवले जाणार नाही अशा पध्दतीने सरकार त्यातून मार्ग काढेल, असेही पवार यांनी नमूद केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)