esakal | शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले; शरद पवारांना केली विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

Pawar_Athawale

मार्ग काढूनही आंदोलन मागे घेण्यास शेतकरी तयार नाही. अशा प्रकारे दबाव टाकून कायदे रद्द करण्याचे काम होत असले, तर सरकार चालणार कसे.

शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले; शरद पवारांना केली विनंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. शेतकरी नेते हटवादी असून राजकीय फायदा घेण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे,’ अशा शब्दात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी शेतकरी आंदोलकांवर टीका केली. शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेत आहेत. त्यांना शेतकरी प्रश्‍नांची जाण आहे, त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे न राहता मध्यस्ती करावी, अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली.

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

पुण्यात कार्यक्रमासाठी आले असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीतील शेतकरी आंदोलन, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग, राज्यातील महविकास आघाडी ते पुणे महापालिकांच्या आगामी निवडणूका या विषयांवर सविस्तर मते मांडली. आठवले म्हणाले, ‘‘मार्ग काढूनही आंदोलन मागे घेण्यास शेतकरी तयार नाही. अशा प्रकारे दबाव टाकून कायदे रद्द करण्याचे काम होत असले, तर सरकार चालणार कसे. हे चुकीच्या पद्धतीने सुरू असून लोकशाहीला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’

PMPमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या​

ठाकरेंना साकडे घालणार
राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार फार काळ चालणारे नाही. त्यामुळे ठाकरे यांनी अजून एक वर्ष मुख्यमंत्रिपदावर राहून पुन्हा भाजप-आरपीआयबरोबर यावे, पुढील तीन वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद द्यावे, असा प्रस्ताव मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपबरोबरच आमची युती कायम राहणार आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे पुणे महापालिकेतील एक वर्षासाठीचे उपमहापौरपद भाजपने आम्हाला दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. अण्णा हजारे यांनी पुन्हा उपोषण करून नये, असे आवाहनही त्यांनी केले.

'तडीपार करेन नाही तर, मोक्का लावेन'; अजित पवार गरजले​

वंचित बहुजन विकास आघाडीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असे सांगून आठवले म्हणाले,‘‘ महाविकास आघाडी सरकारने संभाजी भिडे यांना अटक करावी.’’

मातंग समाजाच्या प्रश्‍नासंदर्भात आठवले यांनी रविवारी बैठक घेतली. त्यावर विचारले असता, आठवले म्हणाले,‘ मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची देखील भूमिका आहे. त्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. ती झाली, तर प्रत्येक समाजाला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण देणे शक्य होईल.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image