esakal | पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar}

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कोरोनाबाबत आढावा घेतला.

pune
पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता जम्बो हॉस्पिटलला मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान, यापुढे जम्बो हॉस्पिटलला तीन महिन्यांची मुदतवाढ द्यायची असल्यास ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. 

PIFF 2021: सिनेरसिकांनो, पिफच्या तारखांमध्ये बदल; महोत्सव पुढे ढकलला

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कोरोनाबाबत आढावा घेतला. प्रशासनाची रणनीती काय असेल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते. 

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल​

जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून समितीने निर्णय घ्यावा. कोरोनामुळे मृत्यू दर किती आहे, खासगी रुग्णालयांकडून सेवा घेण्यासाठी त्यांची सुविधांबाबत कितपत तयारी आहे, याबाबत माहिती घ्यावी. कोरोनाच्या कालावधीत खासगी रुग्णालयांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत प्रलंबित असलेली वैद्यकीय बिले द्यावीत. तसेच, इतर प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या. 

मास्कच्या कारवाईला गती द्या- पवार 
मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईला गती द्यावी. त्यासाठी महसूल, पोलिस, महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त पथके तयार करावीत, असे निर्देश पवार यांनी दिले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)