esakal | मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल

बोलून बातमी शोधा

Pooja_Chavan

पोलिसांनी आत्तापर्यंत काही तपास केला असेल आणि त्यांना त्यातून काय आढळून आले आहे, यानुसार पोलिस त्यांच्या अधिकारात गुन्हा दाखल करू शकतात.​

मोठी बातमी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यात खासगी खटला दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूजा चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारा खासगी खटला येथील लष्कर न्यायालयात शुक्रवारी (ता.26) दाखल झाला आहे. या खटल्याचे पुढे काय होणार याचा निकाल 5 मार्च रोजी होणार आहे.

न्यायालयाने गुन्हा दाखल करून घेत पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणात नाव असलेल्या मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खटला दाखल करून घेण्यासाठी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे अॅड. भक्ती पांढरे यांनी लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांच्या न्यायालयात हा खटला दाखल झाला आहे.

वीर जवान अमर रहे! सुभेदार लक्ष्मण डोईफोडे अनंतात विलीन!​

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र तरी देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पूजा यांना कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी आम्ही हा खटला दाखल केला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.

खटल्यात कोणाचेही नाव नाही :
महाआघाडातील एका मंत्र्यासोबत असलेल्या संबंधातून पूजा हिने आत्महत्या केली, अशी चर्चा आहे. मात्र न्यायालयात खटला दाखल करताना कोणत्याही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही.

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल​

पूजा यांच्या आत्महत्येनंतर एका मंत्र्याच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे. तपास न झाल्यास मृत्युबाबतचे पुरावे आरोपींद्वारा नष्ट केले जाऊ शकता. त्यामुळे न्यायालयाने या बाबत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देणे आवश्‍यक आहे. आम्ही यापूर्वी वानवडी पोलिसांत अर्ज दिला होता. मात्र त्याबाबत पोलिसांची उदासीनता दिसून आली.
- अॅड. विजयसिंह ठोंबरे, अध्यक्ष, लीगल जस्टीस सोसायटी

तंटामुक्तच्या अध्यक्षालाच मारहाण; 9 जणांवर गुन्हा​

काय गुन्हा दाखल करायचा याचे अधिकार पोलिसांना :
पूजा यांना कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले असेल, तर त्यांच्यावर भादवी कलम ३०६ नुसार, तर पूजा यांना कोणी इमारतीवरून ढकलून दिले असेल तर आरोपींवर ३०२ कलम म्हणजे खूनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पोलिसांनी आत्तापर्यंत काही तपास केला असेल आणि त्यांना त्यातून काय आढळून आले आहे, यानुसार पोलिस त्यांच्या अधिकारात गुन्हा दाखल करू शकतात.

या आहेत मागण्या :
- वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास करावा.
- खटला गुणदोषावर चालवून आरोपींना कडक शासन करावे.
- आवश्‍यकता भासल्यास आणखी पुरावे देण्याची परवानगी असावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)