कन्‍टेन्मेंट झोनमधील लॉकडाउनबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; 10 ते 17 मे कालावधीत...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

-  गरज भासल्यास राज्‍य राखीव पोलिस दलाची मदत
- रुग्‍ण अधिक असलेल्या भागातून कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी नाही.

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मेपर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या सूचना उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिल्‍या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्‍ह्यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेऊन उपमुख्‍यमंत्री पवार यांनी शुक्रवारी (ता.८) येथील विधानभवनात (कॉन्सिल हॉल) बैठक घेतली. 

- पुणेकरांच्या प्रश्नांना मिळाली उत्तरे; असा आहे तिसरा लॉकडाउन

उपमुख्‍यमंत्री पवार म्‍हणाले, येथील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सध्‍या कार्यरत असलेले अधिकारी सक्षम असले तरी त्‍यांच्‍या मदतीसाठी इतरही अनुभवी अधिकारी दिले आहेत. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्‍हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्‍य विभाग या सर्वांनी समन्‍वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी.

- पुणे : 'या' भागातील ७० हजार नागरिकांना मनपा देणार रेशन कीट!

कोरोनाचा संसर्ग रोखण्‍याबरोबरच खरीप हंगामाची जबाबदारी जिल्‍हा प्रशासनावर येणार आहे. यामध्‍ये योग्‍य तो समन्‍वय राखून नियोजनबध्‍द काम करावे. कोरोना रोखण्‍याच्‍या कामाला गती यावी यासाठी महसूल विभागातील वरिष्‍ठ अधिकारी डॉ. नितीन करीर आणि महेश पाठक यांचीही नेमणूक करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

- परीक्षा फी अन् बॅकलाॅगचं काय होणार? विद्यार्थी गोंधळले!

परराज्‍यातील जे मजूर आपापल्‍या राज्‍यात जाऊ इच्छित असतील त्‍यांना रेल्‍वेने पाठविण्‍याचे नियोजन करण्‍यात यावे. या मजुरांच्‍या प्रवासाचा खर्च राज्‍य सरकार किंवा सीएसआर फंडातून (सामाजिक उत्‍तरदायित्‍व निधी) करण्‍यात येईल. शहरातील ज्‍या भागात कोरोना बाधित रुग्‍ण अधिक आहेत, तेथून कोणालाही बाहेर जाऊ देण्‍यात येऊ नये, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्‍यमंत्री पवार यांनी दिले.

राज्‍य राखीव पोलिस दलाची मदत घ्‍यावयाची असेल तर तीही मदत उपलब्‍ध करुन दिली जाईल, असे त्‍यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar has instructed to strictly implement lockdown in the containment zone