Ajit Pawarsakal
पुणे
Ajit Pawar: पुण्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध :अजित पवार, पाषाण, सोमेश्वरवाडीत कामांचे लोकार्पण
Pune News: औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी परिसरातील विकासकामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा व वाहतूक सुधारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
औंध : ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येला न्याय देण्यासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. विकासकामांसाठी राज्य सरकार आणि महापालिका कटिबद्ध आहे,’’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली.