esakal | केंद्राने आधी परदेशात लस देण्याची गरज नव्हती - उपमुख्यमंत्री

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यात ही कोरोना बधितांचे प्रमाण वाढल्याचं अजित पवार म्हणाले.

केंद्राने आधी परदेशात लस देण्याची गरज नव्हती - उपमुख्यमंत्री

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे आपण हिरक महोत्सवी वर्ष असून साजरे करू शकलो नाही असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकऱणासाठी निर्णय़ घेतला होता. त्यासाठी 5 कोटी 71 लाख, म्हणजे 6 कोटी साधारण संख्या होती. एक रकमी पैसे भरण्याचे आमचे नियोजन होते. मात्र लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतलाय. आता लशीसाठी भारत बायोटेककडे आपण प्रयत्न करत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावणार आहे. याबाबत सांगताना अजित पवार म्हणाले की, सध्या दुर्गम भागात ऑनलाइन नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. तसंच आजच्या दिवशी फक्त 3 लाख लशी मिळाल्या आहेत. त्यापैकी 20 हजार लशी या पुण्यासाठी असून मुंबईला अधिक आहे अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. तरुणांना आणि ज्येष्ठाना कुठे दिली जाईल याची नियोजन करावे लागेल, मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. लसीचे उत्पादन लक्षात घेता परदेशाततील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का याबाबत विचार सुरु असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

हेही वाचा: प्लाझ्मा दान करण्यासाठी पोलिस आयुक्तांचे पुणेकरांना आवाहन

परदेशात लस देण्याची गरज नव्हती

पहिल्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण होते. तर इतर राज्यात त्या तुलनेत कमी रुग्ण होते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यात ही कोरोना बधितांचे प्रमाण वाढल्याचं अजित पवार म्हणाले. लसीकरणाच्या मुद्यावरून बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, सुरवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असे माझे स्पष्ट मत आहे

तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्याची तयारी

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. तो आणखी 15 दिवसांनी वाढवला आहे. याबाबत सांगताना अजित पवार म्हणाले की, 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. जुलै ऑगस्ट मध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय त्या दृष्टीने काळजी घेतोय आपण तयारी करतोय, या अनुभवातून भारत सरकार आणि वेगवेगळे राज्य सरकार ही शिकलेत असंही अजित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा: कुटुंबीयांनी एकमेकांना आधार देत मनातील भीती लावली पळून

ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी प्रयत्न

ऑक्सिजन किंवा रेमडिसिव्हीआर चा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेतोय. ऑक्सिजनसाठी अधिकारी काम करतायत. कुठून सोय करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. साखर कारखान्यांना आवाहन करण्यात आलं आहे. गडहिंग्लजला प्लांट लावला आहे. इतर ठिकाणी काही करता येतंय का ते पाहिलं जातंय. मोठ्या रुग्णालयांमध्ये प्लांट लावला तर रुग्णांची सोय होईल. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेतली जाईल आणि नियोजन करण्यात येईल.