esakal | कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!
sakal

बोलून बातमी शोधा

DIG_Swati_Sathe

कारागृहांचे नूतनीकरण आणि बंदीवानांचे वर्तणूक सुधारणेसह त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या आहेत.

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कारागृह उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्यानंतर दोन वेळा मुख्यालयाचा आणि एकदा पश्चिम विभागाचा पदभार असे सुमारे सहा वर्षे पुण्यात कार्यरत असलेल्या कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजी) स्वाती साठे यांची नागपुरात बदली झाली आहे. कारागृहाच्या पूर्व विभागातील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

- तब्बल १०० दिवसांनंतर खुली होणार पुण्यातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ; पण 'या' पद्धतीने!

गृह विभागाच्यावतीने साठे यांच्या बदलीचे आदेश सोमवारी (ता.१५) जारी करण्यात आले. पूर्व विभागाचे उपमहानिरीक्षक पद काही महिन्यापासून रिक्त होते. त्याचा अतिरिक्त कार्यभार अमरावती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांच्याकडे होता. साठे या गेल्या आठ महिन्यांपासून पुणे येथील कारागृह मुख्यालयात आस्थापना विभागाच्या उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

- 'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'

या आधी त्या पश्चिम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक होत्या. त्यांनी नाशिक, येरवडा, मुंबईतील ऑर्थर रोड जेलच्या प्रमुख तसेच नागपूर विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून कामगिरी बजावली आहे. कारागृहांचे नूतनीकरण आणि बंदीवानांचे वर्तणूक सुधारणेसह त्यांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या आहेत.

- 'शाळा बंद पण फी भरा'; शिक्षण संस्थांनी लावला पालकांकडे तगादा!

दरम्यान, याबाबत साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र सोमवारी दुपारी बदलीचा आदेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top