Pune Crime: बँकेच्या डेप्यूटी मॅनेजरचाच तिजोरीवर डल्ला! पैसे गुंतवण्याचंही केलं होतं प्लॅनिंग, पण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deputy manager of the bank himself stole two crores of rupees pune crime news

Pune Crime: बँकेच्या डेप्यूटी मॅनेजरचाच तिजोरीवर डल्ला! पैसे गुंतवण्याचंही केलं होतं प्लॅनिंग, पण..

पुणे : बँकेच्या डेप्यूटी मॅनेजरने च पदाचा गैरवापर करत बँकेतून तब्बल दोन कोटी रुपये पळवल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या मॅनेजरसह त्याच्या साथीदरांना रकमेसह अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाने पुण्यातील कॅम्प परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून बनावट नोटा घेवून काही लोक येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा देखील रचला आणि गाडी पकडली. मात्र, त्यामध्ये पोलिसांना बनावट नोटा सोडून 2 कोटी रुपयांच्या 500 आणि 2 हजारांच्या खऱ्या नोटा सापडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल गोरखनाथ कंचार, संतोष वैजनाथ महाजन व सुशिल सुरेश रावले अशी आरोपींची नावे आहेत. तर सुशिल रावले हा बँक ऑफ महाराष्ट्र मंचर करन्सी चेस्ट येथे डेप्युटी मॅनेजर आहे. त्याने पदाचा गैरवापर करून अनधिकृतपणे ही रक्कम बँकेतून काढल्याचे समोर आले.

हेही वाचा: Jitendra Awhad: आव्हाडांना अटकेपासून दिलासा! ठाणे कोर्टाने दिले महत्वाचे आदेश

पैशांचं काय करणार होते?

अमोल कंचार याची कंचार फाऊंडेशन नावाने ट्रस्ट आहे. दरम्यान ही रक्कम आरोपी हे एका मोठ्या कंपनीला देणार होते. जी कंपनी पुढे परतावा म्हणून टक्केवारीने मोठी रक्कम ट्रस्टच्या खात्यावर डोनेशन म्हणून देणार होती. ज्यातून कंचार हा शिक्षणसंस्था उभारणार होता. तर उरलेले पैसे हे तिघे वाटून घेणार होते. पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी सुशील व त्याच्या दोन साथीदारांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: थरार! पत्नीने हात धरले आणि भावाने गळा कापला; अनैतिक संबंधामुळे घेतला जीव

टॅग्स :Pune News