नक्षलवाद्यांविरोधात लढलेल्या या दबंग सुपुत्रामुळे इंदापूरकरांची फुगली छाती

डॉ. संदेश शहा 
Friday, 1 May 2020

पोलिस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह घोषित झाले आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील भाटनिमगावचे सुपुत्र व सध्या गडचिरोली येथे कार्यरत असलेले पोलिस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह घोषित झाले आहे.

नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळे त्यांना हे पदक घोषित झाले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, पोलिस महासंचालक पदक पटकवणारे ते तालुक्‍यातील पहिलेच अधिकारी आहेत. भाटनिमगाव व इंदापूर तालुक्‍यातील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. 

दहावीच्या कलचाचणीचा निकाल आज

गायकवाड हे सन 2016 मध्ये एमपीएसीसी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे प्रथम क्रमांकाने ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर ते 2018 मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाले. एक तरुण उमदा अधिकारी म्हणून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते भाटनिमगावचे माजी सरपंच पंजाबराव गायकवाड यांचे पुतणे आहेत.माजी सरपंच मनोहर भोसले यांनी गावाच्या वतीने विक्रांत गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, राज्यातील जे अधिकारी उत्कृष्टसेवा, गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई, नक्षलवादविरोधी कारवाई, दरोडेखोरांविरोधात कारवाई, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करताना केलेली उत्कृष्ट कामगिरी करतात. त्यांचा पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Superintendent of Police Vikrant Himmat Gaikwad honored by Director General of Police.