
Mangeshkar Hospital: प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला पैशांअभावी उपचार नाकारल्यानं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी रुग्णालयानं देखील सविस्तर आपली बाजू मांडली आहे. पण रुग्णालयानं बाजू मांडली असली तरी एका व्यक्तीचा जीव गेला असल्यानं याप्रकरणाची संबंधीत सर्व घटकांचा विचार करुन योग्य ती कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.