Success Story : पाय गमावूनही गणेश डॉक्टर होऊन ठाम उभा; आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत स्वप्न केले पूर्ण
inspiring story : जालन्यातील गणेश पांढरे यांनी सहावीत पाय गमावला तरीही शिक्षण न थांबवता डॉक्टर होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले. त्यांची कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.
औंध : आई-वडील मोलमजुरी करून घर चालवायचे, आर्थिक परिस्थिती बेताचीच आणि अशातच सहावीत असताना झालेल्या अपघातात पाय गमावला. मात्र त्यानंतरही खचून न जाता शिक्षण घेत अखेर जिद्दीने त्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केलेच.