"नगरपालिका असूनही पालिकेचा विकास व विस्तार देखणा आणि लक्षणीय आहे"

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरातsakal

सासवड : माजी आमदार स्व. चंदुकाका जगताप यांनी सासवड नगरपालिकेचा विविधांगी विकास केला. त्यातून राज्यपातळीवर स्वच्छतेत चमकदार कामगिरी करणारी ही नगरपालिका देशातही स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात चमकली. क वर्ग नगरपालिका असूनही पालिकेचा विकास व विस्तार देखणा आणि लक्षणीय आहे., असे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सासवड़ येथे काढले.

पुरंदर तालुक्याच्या दौऱयावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह आज आले होते. त्यावेळी सासवड (ता. पुरंदर) येथे नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराशी त्यांचे स्वागत झाले. त्यावेळी मंत्री श्री. थोरात यांनी पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या उपस्थितीत जाहीरपणे भावना व्यक्त केल्या. यावेळी आमदार संजय जगताप यांनी सांगितले की., सासवड नगरपालिका प्रशासकीय इमारत छोटी होती. आता विस्तार केला आहे. लवकरच इमारतीचे उद्घाटन करायचे आहे. आपल्याला उद्घाटनास वेळ असे पत्र दिले आहे. यावर महसूल मंत्री थोरात यांनी राज्यमंत्री कदम यांच्याकडे पाहतच सांगितले की., लवकरच या टुमदार व देखण्या इमारतीच्या उद्घाटनास वेळ देऊ. यावेळी सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष पुष्पा जगताप यांनी महसूल मंत्री थोरात आणि राज्यमंत्री कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार संजय जगताप यांचाही सन्मान पालिकेतर्फे झाला.

बाळासाहेब थोरात
अनिल परबांची कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच - मनसे वैभव खेडेकर

नगराध्यक्ष मार्तंड भोंडे हे वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांनी सत्कार करताना.. मंत्री थोरात आमदार जगताप यांच्याकडे पाहत म्हणाले., चंदुकाका जगताप यांचा शैक्षणिक, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील कार्य आपण जाणतो. श्री. भोंडे यांच्या रुपाने आदरणीय व स्वर्गीय चंदुकाकांची टिम अजूनही तुमच्याबरोबर काम करीत आहेत. तुम्ही नव्या पिढीला बरोबर घेतले आहे. याचे मला कौतुक वाटते. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील मोरे, तहसिलदार रुपाली सरनौबत, नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, सुहास लांडगे, संजय ग. जगताप, विजय वढणे, सागर जगताप, संदीप राऊत, नगरसेविका वसुधा आनंदे, सारीका हिवरकर, सीमा भोंगळे, दिपक टकले, यशवंतकाका जगताप, सासवड शहर काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब पायगुडे, महिला अध्यक्षा राजगौरी जगताप आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com