esakal | अनिल परबांची कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच - मनसे वैभव खेडेकर | vaibhav khedekar
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल परबांची कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच - मनसे वैभव खेडेकर

अनिल परबांची कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच - मनसे वैभव खेडेकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- विनोद तळेकर

खेड: खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav khedekar) यांनी रामदास कदम (ramdas kadam) यांच्याविरोधात ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांना शिवसेना (shivsena) नेते रामदास कदम यांनीच अडचणीत आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर वैभव खेडेकर यांनी भाष्य केलं आहे.

"कोकणाचं हे दुर्देव आहे. आज अशा पद्धतीच राजकीय वातावरण पाहायला मिळतय. जे कधीच नव्हतं. खरंतर कोकणातल्या पर्यटन व्यवसायावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. आमचे हजारो उद्योजक आहेत. त्यांचे हजारो रिसॉटर्स आहेत. यांच्या राजकीय हेव्या दाव्यापोटी कोकणातला उद्योजक रसाताळाला जात आहे. नवीन गुंतवणूक होत नाहीय" असे वैभव खेडेकर म्हणाले.

हेही वाचा: Samantha Divorce |टॉलिवूडची सुपरहिट जोडी विभक्त; परिकथेसारखी होती लव्हस्टोरी

"किरीट सोमय्या यांना माहिती कोण पुरवतोय याची इत्यंभूत माहिती मी दिली. माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम हे आज किरीट सोमय्यांना माहिती पुरवताना दिसत आहेत. त्यांच्याकडे जेवणावळी होतात. किरीट सोमय्या तिथे येतात. हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहेत" असे वैभव खेडेकर म्हणाले.

हेही वाचा: लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा-नाग चैतन्यने जाहीर केला घटस्फोट

"अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत. अनिल परब यांच्या वास्तुला हात घालणं म्हणजे उद्धवजींच्या एखाद्या वास्तुला हात घालण्यासारखं आहे. स्वत:च्या पक्षातल्या नेतृत्वाला चॅलेज देण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. कुंडली मांडणारा ज्योतिषी शिवसेनेतलाच आहे" असं वैभव खेडेकर म्हणाले.

loading image
go to top