
पुणे - पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य शासनाच्या प्रमुख विभागांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. पण पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन जागा गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असतानाही या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले जात नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेला अधिकारी का दिले जात नाहीत असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.