Video : धरणात पाणी असूनही गुरुवारी पुरवठा बंद का? : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

शहराबरोबरच शेतीलाही पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी महापालिकेने पूर्ण क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्यानांसाठी वापरले पाहिजे. मुंढवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून मिळणारे पाणी शेतीसाठी योग्य नसल्यामुळे वापरता येत नाही, त्यासाठी जायका प्रकल्प तातडीने मार्गी लावावा. या प्रकल्पासाठी शहरातील काही जागा पालिकेला मिळाल्या आहेत, त्या ताब्यात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम पूर्ण होणार नाही.

पुणे : ''खडकवासला धरण प्रकल्पात मुबलक पाणी असूनही दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद का ठेवला जातो'', असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित केला. शेतीला पुरेसे पाणी मिळावे. तसेच, 'जायका'सह प्रलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाटील म्हणाले, की ''पुणे शहरासह ग्रामीण भागातील सिंचनाच्या पाणीपुरवठ्याबाबत बैठकीत चर्चा झाली. जलसंपदा विभागाकडून पालिकेला हवे तेवढे पाणी दिले जात आहे, तरी शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद केला जात आहे, अशी तक्रार नागरिकांची आहे. देखभाल दुरुस्तीसाठी तो बंद ठेवण्यात येतो. परंतु, पुन्हा तक्रार येणार नाही'', असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. 

खुशखबर! पुण्यातील हिंजवडीची वाहतूक कोंडी सुटणार

''शहराबरोबरच शेतीलाही पाणी मिळाले पाहिजे, त्यासाठी महापालिकेने पूर्ण क्षमतेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्यानांसाठी वापरले पाहिजे. मुंढवा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून मिळणारे पाणी शेतीसाठी योग्य नसल्यामुळे वापरता येत नाही, त्यासाठी जायका प्रकल्प तातडीने मार्गी लावावा. या प्रकल्पासाठी शहरातील काही जागा पालिकेला मिळाल्या आहेत, त्या ताब्यात घेतल्याशिवाय प्रकल्पाचे काम पूर्ण होणार नाही. याबाबत आमदार अजित पवार यांनी 15 जानेवारीपर्यंत त्या जागा महापालिकेच्या नावावर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत; परंतु जागा ताब्यात घेणे आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्प राबविण्यास तीन वर्षे लागतील,'' असे पाटील म्हणाले. 

पुणे : बालभारती करणार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: despite water in the dam why water supply is closed on Thursday asked Chandrakant Patil