Pune Rains : स्मशानात राहणाऱ्या माऊलीचे कुटुंब उध्वस्त

विठ्ठल तांबे
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

स्मशानात राहणार्‍या शकुंतला भोसले, जावई तानाजी पाटोळे, मुलगी प्रतिभा पाटोळे तसेच नातवंडे दोन लहान मुले आयुश व आरोश पुराच्या पाण्यात वाचलो या भावनेने हळहळून गेले.

धायरी (पुणे) : वडगांव बु. येथे बुधवारी ओढ्याला आलेल्या पुराने अक्षरशः थैमान घातले होते. या परिस्थितीत मात्र स्मशानात राहणार्‍या शकुंतला भोसले, जावई तानाजी पाटोळे, मुलगी प्रतिभा पाटोळे तसेच नातवंडे दोन लहान मुले आयुश व आरोश पुराच्या पाण्यात वाचलो या भावनेने हळहळून गेले.

वडगांव बु. स्मशान भूमीची भित पाण्याच्या प्रवाहाने वाहात आलेल्या गाड्या व कचरा यामुळे पडली, ज्याठिकाणी ही भींत पडली त्याला लागूनच पाच ते दहा फुटावर याचे घर आहे. नशिबाने हे कुटुंब वाचले पण त्याचा संपूर्ण संसार मात्र वाहून गेले. हे पाहून माय माऊली मदती साठी हळहळली. डोळ्यासमोर गाड्या, माणस वाहून जात होती .हे ती विसरू शकत नाही. हे कुटुंब खुप घाबरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Destroy home due to heavy rains in pune