पौड - मुळशी धरण भागातील पहिली डॉक्टर होण्याचा मान ढोकळवाडीतील विशाखा बाळकृष्ण ढोकळे या कन्येने पटकाविला आहे. डॉक्टरकीचे स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगलेल्या विशाखाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही गरुडभरारी घेतली. मुंबईला जेवण डबे वाहतूक संघटनेत जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या अप्पांची नात डॉक्टर झाल्याने ढोकळे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.