Pune : गावठाणाची हद्द निश्चित झाल्याने विकास कामातील अडथळे दूर होतील; सरपंच समिक्षा फराटे पाटील

१९८० साली सिटी सर्वे नोंद झाल्यानंतर तीन पिढ्यांना सुद्धा माहित नव्हते की नक्की गावातील गावठाण जागेची हद्द
determining village boundaries will remove obstacles in development work Sarpanch Samiksha Farate Patil
determining village boundaries will remove obstacles in development work Sarpanch Samiksha Farate PatilSakal
Updated on

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा ( ता. शिरूर ) येथील संपूर्ण गावठाणाची मोजणी नुकतीच करण्यात आली. १९८० साली सीटी सर्व्हे नोंदी झाल्यापासून सुमारे ४३ वर्षांपासून अद्यापपर्यंत गावठाण हद्दीची मोजणी केलेली नसल्यामुळे मांडवगण फराटा गावातील विविध विकास कामांना अडचण येत होत्या. त्यामुळे गावच्या संपूर्ण गावठाणाची मोजणी करून हद्द निश्चिती करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच समिक्षा फराटे पाटील यांनी दिली.

"१९८० साली सिटी सर्वे नोंद झाल्यानंतर तीन पिढ्यांना सुद्धा माहित नव्हते की नक्की गावातील गावठाण जागेची हद्द नेमकी कुठपर्यंत येते. गावाच्या विकासासाठी मांडवगण ग्रामपंचायतीने भूमिअभिलेख विभागाकडे गावठाणाची मोजणी व हद्द निश्चीतीसाठी अर्ज केला होता. येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी अजूनही कठोर पावले उचलावी लागली तरी ग्रामपंचायत भक्कमतेने गावासाठी उभे राहू." असे मत सरपंच समीक्षा फराटे यांनी व्यक्त केले.

शिरूर भूमी उपअधीक्षक अमोल भोसले, भूमापक महादेव सानप, ग्राम विस्तार अधिकारी राठोड साहेब, गावातील जेष्ठ ग्रामस्थ आत्माराम फराटे, बाळासाहेब फराटे, लक्ष्मण फराटे, दिगंबर फराटे, अमोल जगताप, कैलास फराटे, प्रभाकर घाडगे, सुधीर फराटे, सुभाष पाटील फराटे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत फराटे,

सरपंच समिक्षा अक्षय फराटे पाटील, उपसरपंच अशोक जगताप, पांडुरंग मोरे, बिभीषण फराटे, अमोल शितोळे, भाऊसाहेब कोळपे, बेबी चव्हाण, जयश्री थोरात, अर्चना चकोर, भाग्यश्री चोथे, मनीषा मेहेर, उषा मस्तुद, सखुबाई चव्हाण, ग्रामसेवक विशाल नाईकनवरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nirmala Nawale NCP appointment
Why was Surekha Nyare killed?
Kolhapur Shahuwadi killed investigation
saubhagyawati sarpanch
Marathi News Esakal
www.esakal.com