सातारारोड जिल्हाधिकाऱ्यांचा आशावाद
देऊर फेस्टिव्हलमधून घडतील उद्योजक
जिल्हाधिकारी संतोष पाटील; कदम महाविद्यालयातील विविध स्टॉलला भेट
सातारारोड, ता. २० : देऊर फेस्टिव्हलच्या माध्यमातून भविष्यातील उद्योजक घडविले जातील, असा आशावाद व्यक्त करत जिद्द, चिकाटी आणि यश मिळविण्याची ऊर्मी बाळगून प्रामाणिकपणे कष्ट केले, तर यशाचा मार्ग सुकर होतो, त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
देऊर (ता. कोरेगाव) येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या देऊर फेस्टिव्हलमध्ये खाद्यान्न व गृहोपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते. जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कदम होते.
यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सातारा, कोरेगाव, फलटण, खंडाळा तालुक्यातून आलेल्या ५४ संघांच्या माध्यमातून ३११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि पोवाडा, लावणी, शेतकरी गीत, गोंधळ नृत्य, जागरण नृत्य, धनगरी गजीनृत्य, देशभक्तिपर समूह नृत्य, पाश्चात्त्य समूहनृत्य व एकल नृत्य आदी कलाप्रकारांचे सादरीकरण केले.
यावेळी सचिव देवेंद्र कदम, विश्वस्त ॲड. संजीव कदम, धनसिंग कदम, रवींद्र कदम, बाळासाहेब कदम, हरीश पाटणे, ॲड. राजेंद्र कदम, आर. के. कदम, शंकरराव कदम, सुनील नलवडे, धोंडीबा कारंडे, रूपाली कदम, प्रशांत पवार, अशोक चव्हाण, मयूर केंजळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘संशोधनाच्या मूलभूत क्षेत्रात कार्य करणारे विद्यार्थी घडविणाऱ्या श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे कार्य आदर्शवत व प्रेरणादायी आहे.’’
वाढता प्रतिसाद पाहता पुढील वर्षी फेस्टिव्हल दोन दिवसांचा करण्यासाठी संस्था सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही श्री. कदम यांनी दिली.
प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सैन्यदलात निवड झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा तसेच शिवाजी विद्यापीठाच्या खो-खो संघातील अश्वमेध स्पर्धेची खेळाडू ऋतुजा शिंदे आणि पीएचडी मिळवल्याबद्दल माजी विद्यार्थिनी डॉ. मनीषा पवार यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हिम्मत साळुंखे, प्रा. नंदकुमार शेडगे, अमोल कुंभार यांनी परीक्षण केले. ज्येष्ठ रंगकर्मी संदीप जंगम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. सहाय्यक प्रा. प्राजक्ता भिसे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. अशोक शेलार यांनी स्वागत व सहाय्यक प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुंदर पोटभरे यांनी आभार मानले.
---------------------
04629
देऊर : फेस्टिव्हलमध्ये स्टॉलची माहिती घेताना संतोष पाटील, शेजारी संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

