MLA Rahul Kul : कांचन कुल यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानेच दौंडचा विकास

माझ्या कुल कुटुंबाने एकूण ८ विधानसभा निवडणुका लढवल्या. तसेच पक्षनिष्ठा राखत १ लोकसभा निवडणूक लढवली.
MLA Rahul Kul
MLA Rahul Kulsakal

- प्रकाश शेलार

खुटबाव - माझ्या कुल कुटुंबाने एकूण ८ विधानसभा निवडणुका लढवल्या. तसेच पक्षनिष्ठा राखत १ लोकसभा निवडणूक लढवली, २०१९ मध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांना ५ लाख ३० हजार मते मिळाली. या निवडणुकीमध्ये पराभव झाला असला तरी आपण जी लढत दिली त्याची चर्चा दिल्लीपर्यंत रंगली.

या लढतीची दखल भाजपाच्या वरिष्ठ प्रशासनाने घेतली. त्यामुळेच आपण आपली ओळख दिल्लीपर्यंत करू शकलो त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये दौंड तालुक्याला मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणता आला असे प्रतिपादन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केले.

नानगाव (तालुका दौंड) येथे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नातून ३० कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कुल म्हणाले की, प्रांत कार्यालय, क्रीडा संकुल, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा न्यायालय, पोलीस स्टेशन इमारत, नाट्यगृह ही विकास कामांची उदाहरणे आहेत. वाघोली- राहु- पारगाव- यवत या रस्त्यासाठी ७५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

प्रास्ताविकामध्ये माजी उपसरपंच संदीप पाटील खळदकर म्हणाले की, आमदार राहुल कुल यांच्या दूरदृष्टीमुळे अष्टविनायक मार्ग नानगाव मधून गेला, त्यामुळे नानगावचा चेहरा मोहराच बदलला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिवपदी विकास खळदकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार कुल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

अॅड. अशोक खळदकर, भीमा पाटसचे संचालक आबासाहेब खळदकर, राजकुमार मोटे, सचिन शिंदे, निर्जला गुंड, प्रा.सचिन वळु यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सरपंच स्वप्नाली शेलार, उपसरपंच सचिन शेलार, पोलिस पाटील पोपट लव्हे, वडगावचे सरपंच सचिन शेलार, माऊली ससाणे, विठ्ठल गुंड, नंदकिशोर गुंड, मनोहर गुंड, संभाजी खळदकर, प्रा. वासुदेव गुंड, सचिन गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.

अचूक निर्णय व निसर्गाने दिलेली साथ -

यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, यावर्षी जून, जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही. यावेळी खडकवासला प्रकल्पातील धरणे कमी भरली होती तरी धोका पत्करून आपण शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्ये उशीरा पाऊस झाला त्यामुळे रिकामी झालेली धरणे पुन्हा भरली गेली.

त्यानंतर सध्या दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा आगामी २ महिन्यांमध्ये आपण खडकवासला प्रकल्पातील २ आवर्तने देण्याचे नियोजन केले आहे. या निर्णयाला निसर्गाने दिलेल्या साथीमुळेच दुष्काळी परिस्थितीमध्ये दौंड तालुक्यातील शेती हरित आहे असे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com