'कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका'; फडणवीस माध्यमांवर भडकले

Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Summary

काही माध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची बातमी दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई- काही माध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची बातमी दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांना धारेवर धरले. राज्यात नेतृत्व बदलाची कोणतीही शक्यता नाही. विनाकारण अशा बातम्या पसरवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ( Maharashtra Latest Marathi News)

कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नवीन मंत्रिमंडळ झालंय, त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आणि महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी भाजप नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. कुठल्याही प्रकारचा संघटनात्मक बदल महाराष्ट्रात होणार नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या केवळ अफवा आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चांगलं काम करताहेत, पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे हायकमांडही त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे कृपया कंड्या पेटवू नका, पतंगबाजी करु नका, खोट्या बातम्या पसरवू नका. तुम्हाला बातम्या कमी पडल्या तर एखादी बातमी मी देतो, असं म्हणत फडणवीस यांनी काही माध्यमांना सुनावले.

Devendra Fadnavis
अकाली दलाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या; घटना CCTV मध्ये कैद

दरम्यान, भाजप राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल हे नेतेही आहेत. चंद्रकांत पाटील नव्या नेत्यांसह वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी. नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचीही भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांनी एक दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनतर त्यांनी दिल्ली दौरा केला. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण, दिल्ली दौरा पूर्वनियोजित असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com