....अन फडणवीस म्हणाले 'मी पुन्हा येईन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

चिंचवड येथे आयोजित मोरया युथ फेस्टिव्हलमध्ये युवकांसोबत मुक्त संवाद कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

पिंपरी : चिंचवडमधील एका कार्यक्रमात विधानसभेचे विरोधो पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ' मी पुन्हा येईन ' या वाक्याचा नेहमीच्या शौलीत उल्लेख केला. अन उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवड येथे आयोजित मोरया युथ फेस्टिव्हलमध्ये युवकांसोबत मुक्त संवाद कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'मी पुन्हा येईन' या वाक्यामुळे फडणवीस चांगलेच चर्चेत आले.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

फडणवीस यांना हे वाक्य मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचेही बोलले जाते. अशातच शनिवारी या कार्यक्रमात फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' असे नमूद केले. त्यावर सूत्रसंचालकांनीही तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पुन्हा यावे अशा सदिच्छा फडणवीस यांना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis participate on cultural programme in Pimpri