पुणे: ‘पुणेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाकारले, असे मी म्हणणार नाही. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आमच्या नेत्यांना स्वीकारले,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केले..Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!.पुण्याची जनताच येथील दादा असल्याचेही सूचक विधान त्यांनी केले. ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..फडणवीस म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. प्रचंड मोठा विजय आम्हाला दिलेला आहे. विजयाचा आनंद आहे, पण जबाबदारीचा भार वाढला आहे. विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त अधिक काम करावे लागेल.’’.पुण्यात इतर पक्षांतील नगरसेवकांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर फडवीस म्हणाले, ‘‘आम्ही ज्या लोकांना पक्षात घेतले, त्यांची संख्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ९० टक्के कार्यकर्त्यांना जागा मिळालेल्या आहेत आणि विशेषतः पुण्यात जे प्रयोग केले, ते फार यशस्वी झाले आहेत.’’ विरोधक राहणार की नाही? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘विरोधी पक्ष राहणार की नाही, हे सत्ता पक्षाऐवजी विरोधी पक्षाला विचारायला हवे. मी पण विरोधी पक्षात अनेक वर्षे होतो. विरोधी पक्षात असताना जनतेचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, त्यांच्यासाठी काम करावे लागते. घरी बसून कुठलाही विरोधी पक्ष तयार होत नाही.’’ गोष्टी समजतात..माणुसकीला सलाम! कृष्णा नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला जीवदान; कऱ्हाडमध्ये युवकांनी लावली प्राणाची बाजी, थरारक घटना...फडणवीस म्हणाले...- पुण्यातील नेते सक्षम आहेत, कुणाचीही तक्रार करत नाहीत.- राज ठाकरे यांना युतीचा कोणताही फायदा झालेला नाही; मात्र उद्धव ठाकरे यांना तो झालेला दिसतोय- नगरसेवकांची पळवापळवी होणार नाही, एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना आमच्याप्रमाणे एकत्र बोलवले असेल.- अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला येणार नाहीत, हे त्यांनी मला परवाच भेटून सांगितले होते.- भाजपचे कार्यकर्ते समजूतदार आहेत, त्यांना सर्व.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.