PMC : पुणे महापालिकेचे दोन भाग होणार? फडणवीस थेट बोलले | Two Part Of PMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMC : पुणे महापालिकेचे दोन भाग होणार? फडणवीस थेट बोलले

PMC : पुणे महापालिकेचे दोन भाग होणार? फडणवीस थेट बोलले

पुणे : शहराचा विचार केला तर पुणे महानगरपालिका ही राज्यातीलच नाही तर देशातील विस्ताराने सर्वांत मोठी महानगरपालिका आहे. या महापालिकेच्या आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता दोन भाग व्हायला हवेत असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Devendra fadnavis On Two Parts Of PMC)

"पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद आत्ता कशाला काढताय? जेव्हा करायचे आहे तेव्हा बघू, राज्य सरकारकडे अजूनतरी असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. असे प्रस्ताव भविष्यात येऊ शकतात पण अजून आले नाहीत. मुंबई महापालिकेसंदर्भातही असा कुठलाच प्रस्ताव आला नाही. त्यामुळे तुम्ही असे वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचे आहे." असं फडणवीस बोलताना म्हणाले.

हेही वाचा: Ashok Chavan : फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाणांचा तातडीचा दिल्ली दौरा

त्याचबरोबर अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चेवर ते म्हणाले की, आमची अशी कोणतीही भेट झाली नाही. ते आणी मी एकाच ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला पोहोचलो होतो मात्र आमची भेट झाली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही फडणवीसांनी सांगितलं.

Web Title: Devendra Fadnavis Two Parts Pune Corporation Chandrakant Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..