esakal | देवगड हापूस आंब्यांची मार्केट यार्डात आवक वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Devgad Hapus Mango Market Yard

देवगड हापूस आंब्यांची मार्केट यार्डात आवक वाढली

महाशिवरात्रीनिमित्ताने कवठांची आवक

शिवरात्रीनिमित्त फुलांना मागणी

देवगड हापूस आंब्यांची मार्केट यार्डात आवक वाढली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : रविवारी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत देवगड हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेट्यांची आवक झाली. यंदा कोकणातून दरवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के मालाची आवक अपेक्षित आहे.


कच्च्या देवगड हापूसच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीचा भाव ३ ते ६ हजार रुपये आहे. स्थानिक परिसर, अहमदनगर जिल्ह्यातून आंब्याना मागणी असल्याची माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.

maharashtra budget 2021 : राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी काय? वाचा सविस्तर
दरम्यान, केरळ आणि कर्नाटकमध्ये वादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे आंब्यांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा आवक कमी राहणार असल्याचे चित्र सध्या असून शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळण्याची अपेक्षा आहे.
 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाशिवरात्रीनिमित्ताने कवठांची आवक

महाशिवरात्रीच्या निमित्ताने रविवारी मार्केट यार्डात औरंगाबाद, बुलढाणा, बीड, गंगापूर, पंढरपूर, जालना आदी भागातून कवठांची आवक झाली. गेल्या वर्षी दोन हजार गोणींची आवक झाली होती, त्या तुलनेत यंदा १२०० गोणींची आवक झाली असून अवेळी झालेल्या पावसामुळे कवठांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

उत्पादन घटल्याने एका गोणीला ९०० ते १००० रुपये दर आहे. गेल्या वर्षी हा दर ७०० ते ८०० रुपये होता. आवक घटल्याने दर वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कवठांचे उत्पादन घटल्याने आवक कमी झाल्याचे व्यापारी सुभान पटेल यांनी सांगितले.


शिवरात्रीनिमित्त फुलांना मागणी

उन्हाळ्यामुळे विविध फुलांची आवक घटली आहे. शिवरात्रीनिमित्त फुलांची मागणी वाढल्याने बहुतांश फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे

झेंडू - 40-45, गुलछडी 150 -200, बिजली 20-30, कापरी 2040, सुट्टा कागडा - 500-600, शेवंती 80-100, मोगरा 500-700, ॲस्टर (चार गड्डीचे दर) 14-18, सुट्टा (किलो) 100120, गुलाबगड्डी (बारा नगाचे दर) - 20-20, ग्लॅडिएटर 40-50, गुलछडी काडी - 50-80, डच गुलाब (20 नग) 80-120, लिलिंबडल (50 काडी) - 8-10, अबोली लड - 200, जर्बेरा - 10-20, कार्नेशन - 120- 140.

loading image