ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘डिव्हाइस फॉर ड्रीम्स’

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘डिव्हाइस फॉर ड्रीम्स’
Published on

पुणे, ता. २५ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक आणि डिजिटल साधनांद्वारे शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे ‘डिव्हाइस फॉर ड्रीम्स’ हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अभियानातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यासाठी संगणक, लॅपटॉप आणि टॅब देणगी स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या तीन हजार ५०० पेकक्षा अधिक शाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने शाळांच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. गेल्या वर्षी लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि विविध संस्थांच्या सहकार्याने ३०३ शाळा आदर्श करण्यात आल्या. या शाळांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, रोबोटिक्स, आभासी वास्तव, खगोलशास्त्र आणि नवकल्पनांशी संबंधित १५० हून अधिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. यंदा आणखी ५५० शाळांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेले संगणक आणि इतर साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी उद्योग समूह, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, बँका, सार्वजनिक उपक्रम, नवउद्योग, माजी विद्यार्थी तसेच दानशूर नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. संस्थांना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून किंवा अन्य माध्यमातून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. एका विद्यार्थ्याला डिजिटल साधन उपलब्ध करून देण्यापासून ते संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा उभा करण्यापर्यंत या अभियानाचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची समान संधी मिळावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. उद्योग, संस्था, माजी विद्यार्थी आणि दानशूर नागरिकांनी पुढाकार घेतल्यास अधिकाधिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभा करणे शक्य होईल. त्यातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळून त्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com