यंदा दहीहंडीत आठ थर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

पुण्यामध्ये प्रथमच आठ थरांची दहीहंडी फोडली जाणार आहे. यापूर्वी कधीही एवढ्या उंचीवरून दहीहंडी फोडण्यात आलेली नाही. 
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट

पुणे - कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुराचे भान ठेवत आर्थिक व इतर स्वरूपात मदत करून उर्वरित निधीतून दहीदंडी साजरी करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. डीजे, ढोल-ताशांच्या तालावर दहीहंडीचे उंच थर लावून जल्लोष साजरा करण्यासाठी मंडळांची, गोविंदांची तयारी पूर्ण झाली आहे. पुणेकरांना प्रथमच हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या दहीडंडीत आठ थरांचा थरार पाहायला मिळाणार आहे.   

यंदा शहरात पोलिसांनी ९८३ मंडळांना परवानगी दिली आहे. सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष सौरभ रायकर म्हणाले, ‘‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी १० कोटींची मदत जाहीर केली आहे. महापुरामुळे साधेपणाने दहीहंडी साजरी केली जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदा सहा थर लावले जाणार आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhahihandi Level Celebration