

Somvati Amavasya Yatra at Dhamani Khandoba Temple Draws Devotees for Royal Bath Ceremony and Traditional Palkhi Procession
esakal
पारगाव : पुणे, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणार्या धामणी (ता. आंबेगांव) येथे आज सोमवारी सोमवतीच्या निमित्ताने श्री म्हाळसाकांत खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (दि.८)दुपारी अमावस्या प्रारंभ होऊन आज सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सोमवतीचा पर्वकाळ असल्याने पहाटे पाच वाजता शिरुर, आंबेगाव,जुन्नर,खेड तालुक्यातील खंडेरायाच्या सोमवतीचे व मानाच्या काठीचे १० मानकर्यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक व आरती करण्यात आली.