पुण्याच्या विकासाचा ‘मेट्रो’अध्याय!

पुण्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचा मोठ्या धूमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने आधुनिक जीवनशैलीच्या दिशेने पुणेकरांचे आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे.
Pune Metro
Pune MetroSakal
Summary

पुण्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचा मोठ्या धूमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने आधुनिक जीवनशैलीच्या दिशेने पुणेकरांचे आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे.

पुण्यात (Pune) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मेट्रो सेवेचा (Metro Service) मोठ्या धूमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने आधुनिक जीवनशैलीच्या दिशेने पुणेकरांचे आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे. मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न गेली अनेक वर्षे येथील सर्वसामान्य नागरिक पहात होते. ते आता प्रत्यक्षात उतरत आहे. सध्या देशात केवळ १४ मोठ्या शहरांत मेट्रो धावते. आता मेट्रोच्या नकाशावर पुणेही झळकेल. यामुळे हे शहर अधिक वेगवान, आधुनिक आणि कालसुसंगत ठरेल यात शंका नाही.

आजच्या घडीला ५६ देशांतील सुमारे दोनशे प्रगत शहरांत मेट्रो धावते. मेट्रोमुळे केवळ प्रवास वेगवान होतो, मनुष्य तासांची बचत होते अशातला भाग नाही. तर त्यामुळे त्या शहरात एक नवी जीवनशैलीच आकाराला येते. जलद वाहतूकसवेसाठी मेट्रो किफायतशीर असल्याचे जगभर सिद्ध झालेले आहे. पुण्यात जर सध्या सर्वांत मोठी कोणती समस्या असेल तर ती वाहतूक कोडींची. दररोज जीव मुठीत धरून अनेक किलोमीटर प्रवास करताना सर्वसामान्य नागरिक अक्षरशः मेटाकुटीला येतो. शहरातील सहा प्रमुख रस्त्यांवरील या भीषण स्थितीचा आढावा शनिवारी ‘सकाळ’ने घेतला आहेच. अरुंद रस्ते व बेसुमार वाहनसंख्या यांचा कोठेच मेळ बसत नसल्याने गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडीवर कोणताच मार्ग निघत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करणे हाच यावरील तोडगा आहे. मेट्रो सेवेचा प्रारंभ हा त्या दिशेने पडलेले निर्णायक पाऊल ठरणार आहे. मेट्रोचा जसजसा विस्तार होईल तसे साऱ्या शहराच्या विविध भागांत मेट्रो धावू लागेल आणि या समस्येवर मार्ग निघेल अशी आशा आहे. दिल्लीत २००२ मध्ये मेट्रो सेवा सुरु झाली. आज तेथे तब्बल ३४८ किलोमीटरवर मेट्रो विस्तारली आहे. तसाच वेगवान विस्तार पुण्यात होणे गरजेचे आहे.

Pune Metro
स्टार्टअपने बौद्धिक मालमत्ता नियंत्रित करण्याची क्षमता निर्माण करावी - बाबा कल्याणी

विकासाच्या वेगाला चालना

सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या तीन दशकांत माहिती तंत्रज्ञान (आयटी़) उद्योग, वाहन उद्योग बहरला. त्याचे दृश्य परिणाम सर्वांनीच अनुभवले आहेत. या उद्योगांमुळे पुणे तसेच पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलून गेला. दोन्ही शहरांच्या आर्थिक प्रगतीला, सुबत्तेला वेग आला. या उद्योगांना पूरक असे सेवा क्षेत्रही येथे झपाट्याने वाढले आणि रोजगारांच्या अमाप संधी निर्माण झाल्या. चांगल्या शिक्षणाबरोबरच भरपूर रोजगार देणारे शहर म्हणून आज पुण्याची देशभर ख्याती निर्माण झालेली आहे.

मेट्रोमुळे विकासाचा हा वेग आणखी सुसाट होणार आहे. यातून एक नवी जीवनशैली आकाराला येणार असून पुण्याच्या चौफेर प्रगतीला गती येणार आहे. त्यादष्टीने मेट्रो सेवेचा प्रारंभ हा शहराच्या एकूण वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com