esakal | विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay-Munde

राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता अनुदान वाटप  करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी (ता.२९) सांगितले.

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे - राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वसतिगृह भत्ता अनुदान वाटप  करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात हा निधी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी (ता.२९) सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले आणि वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असूनही केवळ वसतिगृहातील रिक्त जागांअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना हे अनुदान देण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, असे या वसतिगृह सानुग्रह अनुदान योजनेचे नाव आहे.

Video : पुणे पोलिसांच्या 'प्लाझ्मादान'मुळे वाचताहेत कोरोना रुग्णांचे जीव!

चालू शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) या योजनेसाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापैकी ३५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मुंडे यांनी  यावेळी स्पष्ट केले. 

बिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत!​

दहावीनंतरचे पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत त्यांचा मासिक खर्च भागवण्यासाठी भत्ता देण्यात येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजनांच्या अंमलबजावणीवर निधीअभावी निर्बंध आलेले आहेत.राज्याची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे, अशा परिस्थितीत या  विद्यार्थ्यांच्या  स्वाधार योजनेनंतर्गत हक्काच्या निधीला ब्रेक लागू नये, यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुर्वी या योजनेची व्याप्ती ही महाधगरांपुरतीच मर्यादित होती. परंतु आता ती महानगरांपुरतीच मर्यादित न ठेवता, ती वाढवून तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय घेण्यात  आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची बाकी असलेली देयके देण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने या निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार हा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निश्र्चितच दिलासा मिळेल.
- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री.

Edited By - Prashant Patil