आमदार जितेंद्र आव्हाड गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी 

मिलिंद संगई
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

बारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी अपशब्द व्यक्त करुन धनगर समाजाचे आराध्यदैवताचा अपमान केला आहे. त्यांच्याविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवरुन केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले. मल्हारराव होळकर यांच्याविषयी आव्हाड यांनी बदनामीकारक पोस्ट टाकून धनगर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा व त्यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आज धनगर समाजबांधवांनी बारामती शहर पोलिस ठाण्याचेनिरिक्षक अशोक धुमाळ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या प्रसंगी किशोर मासाळ, बापूराव सोलनकर, विष्णू चव्हाण, संदीप चोपडे, गोविंद देवकाते, नवनाथ मलगुंडे, नीलेश धालपे, अभिजीत देवकाते, अँड. अमोल सातकर, किशोर सातकर, ज्ञानदेव खामगळ, रुपेश सोलनकर, संदीप गोफणे, गणेश बंडगर, आकाश मोरे, अमोल चोपडे, सुनील देवकाते, वैभव बुरुंगले आदी उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community demand to file complaint against Jitendra Awhad