ओबीसी आरक्षणात मराठा आरक्षणाला घुसवू नका; वाचा, कोण म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

प्रा. हाके म्हणाले, मराठा समाज हा महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये नेहमी राज्यकर्ती जमात म्हणून मुख्य भूमिकेत राहिला आहे. शेकडो वर्षांपासून आर्थिक संसाधने, शेती, कारखानदारी, शिक्षण संस्था, राजकारण मराठा समाजाने व्यापलेली आहेत.

पुणे - 'मराठा समाजातील काही संघटनाकडून ओबीसी कोट्यातून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी होत आहे. अश्या प्रकारे आरक्षण दिल्यास मूळ ५२ टक्के ओबीसींचे २७ टक्के आरक्षण धोक्यात येईल. त्यामुळे मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतर विकासाच्या प्रक्रियेत आलेल्या ओबीसी समाजाच्या प्रगतीला खीळ बसेल. ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू', असा इशारा आज धनगर समाजाचे नेते आणि ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला .

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रा. हाके म्हणाले, "मराठा समाज हा महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये नेहमी राज्यकर्ती जमात म्हणून मुख्य भूमिकेत राहिला आहे. शेकडो वर्षांपासून आर्थिक संसाधने, शेती, कारखानदारी, शिक्षण संस्था, राजकारण मराठा समाजाने व्यापलेली आहेत. आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' कार्यक्रम नाही. सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित होण्यासाठी वंचित घटकांना प्रतिनिधित्व देणे हा आरक्षणाचा मूळ उद्देश असून मंडल आयोगाच्या अंमल बजावणीनंतर काही प्रमाणात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झाली. आता त्यातही मराठा समाज वाटेकरी झाल्यास 52 टक्के ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar community leader prof Laxman Hake warned Do not insert Maratha reservation in OBC reservation