

Villagers Protest with “Rasta Roko” Demanding Strict Action
Sakal
नारायणगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रक व ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉल्यात प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरून असुरक्षित केली जाणारी उसाची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. त्या मध्ये नादुरुस्त रस्त्यांची भर पडली आहे.यामुळे डिसेंबर महिन्यात दोन महिलांचा नाहक मृत्यू झाला असून एक महिला व दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.जीवघेणी बेकायदेशीर ऊस वाहतूक थांबवण्यासाठी सहकारी साखर प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथील क्षेत्रीय परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांनी कार्यवाही करावी.