esakal | सांगा कसं जायचं दररोज या रस्त्यानं..; ग्रामस्थांसह वाहन चालकांना प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanore Road

सांगा कसं जायचं दररोज या रस्त्यानं..; ग्रामस्थांसह वाहन चालकांना प्रश्न

sakal_logo
By
प्रा. नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - धानोरे (ता. शिरूर) येथील धानोरे ते तळेगाव ढमढेरे या संपूर्ण रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकासह सर्वांनाच हा रस्ता गैरसोईचा झाला आहे. सांगा कसं जायचं दररोज या रस्त्यानं.. असा प्रश्न ग्रामस्थांसह वाहन चालकांना पडला आहे. धानोरे ग्रामस्थांना तळेगाव ढमढेरे येथील बाजारपेठ जवळ असल्याने ग्रामस्थांना दररोज या रस्त्याने ये- जा करावी लागते. अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित पाहणी करून रस्त्याचे नवीन काम व सुधारणा करावी अशी मागणी सरपंच कालिदास झगडे व ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: शिक्रापूर : अबब..! शिक्रापूरात दोन दिवसात ४३०० जणांचे महालसीकरण

दरम्यान, धानोरे गावाजवळून बेल्हा- जेजुरी हा राष्ट्रीय महामार्ग जात असून, तळेगाव ढमढेरे येथील बाजारपेठ जवळच आहे. तळेगाव ढमढेरे येथे विविध बँका, पोस्ट ऑफिस, शाळा, महाविद्यालय, बाजार समिती, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस दूरक्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधा मिळत असल्याने धानोरे येथील बहुताश ग्रामस्थ विविध कामासाठी ये- जा करतात त्यामुळे हा रस्ता सतत रहदारीचा झाला आहे. रस्त्यावरील खड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. धानोरे- तळेगाव ढमढेरे रस्त्याची त्वरीत दुरुस्त करावी अशी मागणी सरपंच श्री झगडे व ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, धानोरे गावातील कंद वस्ती ते जेधे वस्तीवरील रस्त्यावरही मोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याचीही त्वरित पाहणी करून रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

loading image
go to top