श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मंचरच्याभाविकांसाठी होणारअद्यावत धर्मशाळा , एक तासात सव्वा कोटी रुपये निधी झाला जमा: देवेंद्र शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dharamshala Pandharpur for devotees of Manchar funds of Rs 50 crore collected Devendra Shah

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मंचरच्याभाविकांसाठी होणारअद्यावत धर्मशाळा , एक तासात सव्वा कोटी रुपये निधी झाला जमा: देवेंद्र शहा

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळामार्फत श्री क्षेत्र पंढरपूर येथे बांधल्या जाणाऱ्या नूतन धर्मशाळा इमारतीचा भूमिपूजन समारंभ शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व मोरडे फुड्स प्रोडक्टसचे अध्यक्ष हर्षल मोरडे यांच्या हस्ते शनिवारी (ता.२७) झाले. यावेळी मंचर, शेवाळवाडी, निघोटवाडी सह वारकरी सेवा मंडळाचे ४०० हून अधिक भाविक उपस्थित होते.

शहा म्हणाले, “पंढरपूर येथे मंचरकरांनी साडे पाच गुंठे जागा देणगीतून ५५ लाख रुपयांना खरेदी केली. एकूण नऊ हजार स्क्वेअरफुटचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल. प्रशस्त हॉल, बारा खोल्या, व्यापारी गाळे, स्वयंपाक गृह, भोजनालय, स्वच्छता गृह, बगीचा, पार्किंग आदी सुविधा भाविकांना बाराही महिने उपलब्ध होणार आहेत. धर्मशाळेसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक दानशुरांची मदत मिळणार आहे.”

मोरडे म्हणाले, “माझे आजोबा (स्व) एकनाथ मोरडे व वडील चंद्रकांत मोरडे यांची इच्छा होती की मंचरकरांची धर्मशाळा पंढरपूर मध्ये उभी रहावी. धर्मशाळा इमारतीचे भूमिपूजन हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.”

याप्रसंगी कामगार उपायुक्त भास्कर मोरडे, सरपंच नवनाथ निघोट, कांता बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, दत्ता थोरात, सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले, नवनाथ डेरे, वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, भास्कर लोंढे गुरुजी उपस्थित होते. वास्तूविशारद हेमंत पाटील, साजन इंदोरे व बांधकाम व्यवसायिक राहुल अभंग येथील कामकाज पाहत आहे.”

“धर्मशाळा बांधकामासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन शहा यांनी केले. एक तासात तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या देणग्या उत्स्फूर्तपणे जमा झाल्या. त्यामध्ये हर्षल मोरडे, देवेंद्र शहा यांनी धनादेश व बाळासाहेब बेंडे,

संजय थोरात, वामनराव गांजाळे, बाबाजी टेमगिरे, प्रशांत बागल यांनी प्रत्येकी एक खोली बांधून देण्याचे जाहीर केले. ४० भाविकांनी प्रत्येकी एक ते दोन लाख रुपये देणगी दिली. कन्या दिपिका योजने अंतर्गत १५ जणांनी प्रत्येकी २७ हजार रुपये देणगी दिली.”