Pandharpur : 'कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणार'; भालकेंचं थेट शरद पवारांनाच चॅलेंज?

कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी पंढरपूर विधानसभेची निवडणूक (Pandharpur Assembly Election) मी लढविणार आहे.
Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalke
Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalkeesakal
Summary

सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपकडे जात असताना भारत भालके यांनी मात्र शरद पवार यांच्या विचाराबरोबर जात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली.

पंढरपूर : कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी पंढरपूर विधानसभेची निवडणूक (Pandharpur Assembly Election) मी लढविणार आहे. माझ्या नेत्याने दिलेला स्वाभिमानाचा आणि राखून ठेवलेला डाव सुद्धा मला टाकावा लागणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी गुरुवारी केली.

भालके यांच्या घोषणेने विठ्ठल परिवारात फूट पडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांना बळ देणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्यानंतर विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

भालके यांच्या या भूमिकेमुळे पंढरपुरातील राष्ट्रवादीमधील अंतर्गत बंडखोरी उफाळून आली आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भालके गटाची पुढची राजकीय दिशा ठरविण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपुरातील निवासस्थानी पार पडली. या बैठकीत भगीरथ भालके यांनी, जनता हाच माझा पक्ष आहे, असे सांगत विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.

भालके यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी अडचणीत आला आहे. दरम्यान, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळेंना पाठिंबा देण्याचा निर्णय भालके गटाने जाहीर केला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले भगीरथ भालके गटाच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.

Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalke
Balasaheb Patil : पडळकर, दरेकर, खोतांची लोकप्रियतेसाठीच शरद पवारांवर टीका; आमदार पाटलांचा घणाघात

त्यानंतर आज भगीरथ भालके यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करून राष्ट्रवादीला एकप्रकारे शह देण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेची आगामी निवडणूक मी पंढरपूर मतदारसंघातून अटीतटीची आणि आरपारची लढाई म्हणूनच लढणार आहे. त्यावेळी मी जिथं कुठे असेन, त्या ठिकाणी वडिलकीच्या भावनेने माझ्या पाठीशी तुम्हाला उभे राहावं लागणार आहे, अशी अपेक्षा भालके यांनी कल्याणराव काळे यांच्याकडून व्यक्त केली.

भालके म्हणाले की, भारतनाना भालकेंनी २००९ मध्ये रिडालोसकडून, २०१४ मध्ये काँग्रेसकडून, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली. सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपकडे जात असताना भारत भालके यांनी मात्र शरद पवार यांच्या विचाराबरोबर जात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. भारतनाना जरी वेगळ्या पक्षात असले तरी त्यांनी पवार यांच्यावर निष्ठा ठेवली होती. आम्ही सुद्धा भारतनानांच्या विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळे पक्षावर प्रेम केले आहे.

Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalke
Parbhani : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं 'मविआ'समोर थेट आव्हान; वादाची 'ती' ठिणगी वणवा पेटवणार?

पण, अभिजित पाटील यांच्या प्रवेशानंतर तालुक्यात जी चर्चा, कार्यकर्त्यांची घुसमट होती, त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आज बैठक घेतली होती. जनता हाच नानांचा पक्ष होता. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे ‘नाना हेच आमचे पक्ष’ असे मानणारे आहेत. त्यामुळे लोक सांगतील तोच आमचा पक्ष यापुढच्या काळात असणार आहे. लोक सांगतील तीच माझी भूमिका आहे, असेही भालके यांनी स्पष्ट केले. भालके यांच्या भूमिकेनंतर तालुक्यात मोठी राजकीय घडमोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalke
Koregaon Employees Strike : आमदार महेश शिंदेंची शिष्टाई असफल; राष्ट्रवादीच्या नेत्याचा 'त्यांना' पाठिंबा!

बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, आजच्या बैठकीत सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या मतदार यादीत नाव नसल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली तर सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत भालके गटाच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली. यावर कल्याण काळे यांनी मात्र सावध भूमिका घेत, सर्वच उमेदवार हे भालके- काळे गटाचे आहेत, असे स्पष्ट करत, असा कुठे कुणाच्या नावाचा कपाळावर शिक्का मारता येत नाही, असे सांगितले.

Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalke
Karnataka : मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? 50 आमदार दिल्लीत तळ ठोकून, हेब्‍बाळकरांसह 18 जण शर्यतीत

विजयसिंह देशमुखांच्या भूमिकेविषयी नाराजी

आमदारकीला समाधान आवताडे यांच्याबरोबर तर सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांच्या सोबत राहण्याचा निर्णय माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी आज घेतला. देशमुख यांच्या या भूमिकेविषयी भालके गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियातूनही देशमुख यांच्या भूमिकेवर साशंकता व्यक्त करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. अलीकडेच विजयसिंह देशमुख यांनी भालके गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

Pandharpur Assembly Election Bhagirath Bhalke
Kolhapur : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी अरुण डोंगळे; समर्थकांचा 'मैं हूँ डॉन' गाण्यावर ठेका, गुलालाची तुफान उधळण

मागील चार ते सहा महिन्यांपासून ना भालके गटाशी ना भगीरथ भालकेंशी कोणताही संपर्क नसताना आज मात्र अचानक भगीरथ भालके यांनी बोलावलेल्या बैठकीला विजयसिंह देशमुख उपस्थित राहिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भगीरथ भालके यांच्या बैठकीला तुम्ही कसे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर विधानसभेला आमदार समाधान आवताडे यांच्याबरोबर तर सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भगीरथ भालके यांच्या सोबत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com