Pune News : धर्मेंद्र-जितेंद्र जोडीने जागविल्या पुण्याच्या आठवणी; सुधीर गाडगीळांनी घेतली मुलाखत

सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवात मुलाखतीला उत्तर देताना धर्मेंद्र-जितेंद्र बोलत होते.
dharmendra jeetendra
dharmendra jeetendrasakal
Summary

सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवात मुलाखतीला उत्तर देताना धर्मेंद्र-जितेंद्र बोलत होते.

पुणे - मी ६० च्या दशकात पुण्यात शुटींगला यायचो. तेंव्हाचे पुणे शहर म्हणजे शेत शिवाराने वेढलेले सुंदर शहर होते. शुटींग संपल्यावर मी चालत महाराणी झासींच्या पुतळ्याला अभिवादन करायला जायचो, असे म्हणत सिनेअभिनेते धर्मेंद्र यांनी; तर 'कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला. नाही तर दरवर्षी पुण्यात गणेशोत्सवाला माझ्या मित्राकडे येत असतो', असे म्हणत सिने अभिनेते जितेंद्र यांनी पुण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

सेनापती बापट रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवात मुलाखतीला उत्तर देताना ते बोलत होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी धर्मेंद्र-जितेंद्र यांना बोलतं केले. यावेळी ज्येष्ठ अकॉर्डियन वादक इन्हॉक डॅनियल यांचा प्रवासही गाडगीळ यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील,सिंबायोसिसचे अध्यक्ष डॉ. शा.बं. मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या यरवडेकर, दिग्दर्शक निखील साने आदी उपस्थित होते. दोन वर्षाच्या खंडानंतर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्काराने चित्रपट निर्माते निखिल साने यांना गौरविण्यात आले. प्रकट मुलाखतीबरोबरच मकरंद पाटणकर प्रस्तूत संगीत रजनीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्यामुळे चित्रपट सृष्टीत आल्याचे जितेंद्र यांनी सांगितले. ते म्हणाले, "माझ्या वडीलांचे दागीन्यांचे दुकान होते. मी व्ही शांताराम यांच्याकडे ज्वेलरी घेऊन जायचो. पुढे त्याच्याच नवरंग चित्रपटात पहिला अभिनय केला. महिना पगारावर कनिष्ठ अभिनेता म्हणून काम केले. जसे माणसं लागायचे तसे आम्ही जायचो. पुढे त्यांनीच चित्रपट सृष्टीत आणले."

आपल्या भारदस्त नावाचा इतिहास सांगताला धर्मेंद्र म्हणाले, "चित्रपटाचे दिग्दर्शक नाव बदलायला सांगायचे. पण माझ्या आईने मला कुवर धर्मेंद्र असे नाव दिले होते. त्यामुळे पैसे नाही मिळाले तरी चालेल पण नाव बदलायचे नाही, असे ठणकावून सांगायचो. आज लोकांच्या प्रेमामुळे हे नाव समृद्ध झाले आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com