

Pune
esakal
निलेश चांदगुडे
धायरी: धायरी परिसरातील एका केमिकल कंपनीच्या गोदामातून ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिडचे कॅन चोरणाऱ्या तिघांच्या टोळीचा नांदेड सिटी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत पर्दाफाश करत त्यांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.