
धायरी (नऱ्हे) येथील पारी चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांनाही मोठा त्रास होत आहे. यावर तातडीने उपयायोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे. यातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून वाहतूक विभागाला एक निवेदन देण्यात आलंय. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश राजाराम पोकळे यांनी वाहतूक कोंडीवर उपयायोजना कराव्यात अशी विनंती केलीय.