

Dilapidated Anganwadi Puts Children at Risk
Sakal
धायरी : धारेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या लोणारे वस्ती येथील अंगणवाडी क्रमांक १५२ ही महिला व बालविकास विभागाच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा’ योजनेअंतर्गत चालवली जाते. लहान मुलांचे शिक्षण, पोषण आणि आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य येथे चालते. मात्र, या अंगणवाडीची इमारत जीर्ण झाल्याने धोकादायक बनली असून यामुळे मुलांचे भविष्यच धोक्यात आले आहे.