Dhayari Road Accidents: धायरीत निसरड्या रस्त्यामुळे वारंवार अपघात; कचरा वाहणाऱ्या वाहनांमधून गळणारे दूषित पाणी रस्त्यावर

Pune News: धायरी फाटा उड्डाण पूल परिसरात कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांतून गळणाऱ्या दूषित पाण्यामुळे रस्ता निसरडा बनला असून वारंवार अपघात घडत आहेत. सणस शाळेसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी, दुर्गंधी आणि आजारांचा धोका वाढत असून नागरिकांनी महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
Dhayari Road Accidents

Dhayari Road Accidents

sakal

Updated on

धायरी : धायरी फाटा उड्डाण पूल परिसरात सणस शाळेसमोरील रस्त्यावर महापालिकेच्या ठेकेदाराची कचरा वाहून नेणारी वाहने दररोज पार्किंग करून उभी असतात. या वाहनांमधून गळणारे घाण पाणी रस्त्यावर साचत असून त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. परिणामी दुचाकी घसरून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com