ढोल-ताशांनी केली ‘डीजे’ची बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 September 2018

पुणे - ढोल-ताशांच्या वादनाने पुण्यातील मुख्य गणपती विसर्जन मार्गावर जवळपास ‘डीजे’ इतकीच ध्वनी प्रदूषणाची पातळी गाठल्याचे निरीक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाने रविवारी नोंदविले. मात्र, एकूण सरासरीचा विचार करता गेल्या सात वर्षांमधील सर्वांत कमी ध्वनी प्रदूषण करणारी ही मिरवणूक ठरल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. 

या वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’वर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ध्वनी प्रदूषण पातळीबाबत उत्सुकता होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय  गेली १७ वर्षे मुख्य विसर्जन मार्ग असलेल्या २४ तासांतील वेगवेगळ्या दहा चौकांमधील ध्वनी प्रदूषणाची पातळीची नोंद घेते. यंदा घेतलेल्या नोंदीच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे, अशी माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. महेश शिंदीकर यांनी दिली. या सर्वेक्षणात नागेश पवार, सतीश सुखबोटलावार, सुदेश राठोड, पंकज घोगरे, तुषार राठोड, आकाश रघतवान, वैभव नरवाडे, केतन साखरे, तुषार वाघिरे, विशाल भास्कर, सुदर्शन बद्धमवाड, जगन मोकमोड, प्रदीप तिडके, अनिकेत गजभिये, स्वप्नील धुलेवार, ओंकार कामाजी, मुरली कुंभारकर आणि प्रवीण शिवपुजे हे सहभागी झाली होते.

अशा घेतल्या नोंदी
विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा, दुपारी चार, रात्री आठ, मध्यरात्री बारा, पहाटे चार आणि सकाळी आठ या वेळात दहा वेगवेगळ्या चौकांमध्ये आवाजाची पातळी मोजण्यात आली. 

नऊ वर्षांमधील  सर्वांत कमी आवाजाची पातळी
शहरातील २०११च्या मिरवणुकीत ८७.४ डेसिबल इतकी सरासरी आवाजाची पातळी नोंदली गेली होती. त्यानंतर पुढील सात वर्षांमध्ये सर्वांत कमी म्हणजे ९०.४ डेसिबल आवाजाची पातळी यंदा नोंद झाली. गेल्या १६ वर्षांमध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण २०१४ मध्ये ११४.४ डेसिबल झाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhole tasha sound are equal with DJ