esakal | मधुमेहींसाठी महत्त्वाची बातमी : कोरोना उद्रेकात मधुमेहतज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला!
sakal

बोलून बातमी शोधा

die.jpg

मधुमेही आणि सामान्य रुग्ण यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सारखाच आहे. पण, संसर्गानंतर उपचारातील गुंतागुंत ही सामान्यांपेक्षा मधुमेहींमध्ये खूप जास्त असते.

मधुमेहींसाठी महत्त्वाची बातमी : कोरोना उद्रेकात मधुमेहतज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : मधुमेही आणि सामान्य रुग्ण यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सारखाच आहे. पण, संसर्गानंतर उपचारातील गुंतागुंत ही सामान्यांपेक्षा मधुमेहींमध्ये खूप जास्त असते. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनबद्दल काहीही निर्णय घेतला तरीही मधुमेहींनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन सुरूच ठेवावा, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञांनी दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा उद्रेक जगभरात सुरू आहेत. मात्र, मधुमेहींची मोठी संख्या हा भारताच्या दृष्टीने काळजीचा विषय ठरला आहे. या बाबत `सकाळ`शी बोलताना मधुमेहतज्ज्ञांनी हा सल्ला दिला.

मधुमेहींनाच सर्वाधिक धोका का आहे?
कोणत्याही विषाणूंचा संसर्ग मधुमेहींमध्ये गंभीर स्वरुप धारण करण्याचा धोका असतो. कारण, मधुमेहींमधील प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. खूप वर्षांपासून शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने पेशींमधील रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती कमी होते.  

पुण्यातील खव्वयांसाठी महत्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा

साखर वाढली की धोका वाढला
कोरोना संसर्ग कोणालाही होऊ शकतो. सामान्य नागरिकाला संसर्गाचा जितका धोका आहे, तितकाच तो मधुमेही रुग्णांनाही आहे. पण, संसर्गानंतर सामान्य निरोगी माणूस बरा होण्याची शक्यता मधुमेहींच्या तुलनेत अधिक असते. कारण, मधुमेहींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, कोरोनाच्या संसर्गानंतर उपचारातील धोकाही वाढतो. नियंत्रित मधुमेहींमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतरही उपचारातील गुंतागुंत कमी झालेले दिसते. 

मधुमेहींच्या धोक्याची कारणे
- जुन्या मधुमेहाचे दुष्परिणाम : 
रुग्णाला जुना मधुमेह असल्यास दहा-पंधरा वर्षांपासून शरीरावर बरेच दुष्परिणाम झालेले असतात. डोळ्यांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये हे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसतात. तर, मूत्रपिंडाचे कार्य, हृदयक्रिया अशा वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यक्षमतेवरही याचा थेट परिणाम होतो. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वय दहा वर्षांनी वाढवा :
मधुमेहींनी त्यांच्या सध्याच्या वयात दहा वर्षे नेहमी वाढवावी. तितके त्यांचे वय असते. कारण, या आजारामुळे अवयवांवर परिणाम झालेला असतो. त्याचा थेट परिणाम कोरोनाचे उपचार करताना होतो. 

ग्लुकोजची तपासणी
सातत्याने रुग्णांची तपासणी करत रहाणे, हाच कोरोनाच्या नियंत्रणाच्या व्युहरचनेचा भाग असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. त्याप्रमाणेच मधुमेहींनीही वारंवार रक्तातील साखरेचे प्रमाण (ग्लुकोज) तपासणे, ही मधुमेह नियंत्रणाची स्टॅटेजी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असले तरीही त्याच स्पष्ट लक्षणे रुग्णांना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांना सातत्याने ग्लुकोज टेस्ट केली पाहिजे. त्यासाठी ग्लुकोमिटरचा वापर करा. 

सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणा टॉयलेट

टेलिमेडिसीनचा वापर करा
लॉकडाऊन असल्याने रुग्णांना बाहेर पडता आले नाहीत. लॉकडाऊन असले तरीही रुग्णांना बरे वाटत नसेल तर त्यांनी लॉकडाऊन संपण्याची वाट बघत न बसता फोनवरून, व्हिडिओ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन मधुमेह तज्ज्ञांनी केले आहे. 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी...
-    रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित हवे
-    प्रथिनेयुक्त आहार घ्या
-    फळे, भाजीपाला, डाळी, कडधान्य, काजू, बदाम खावा
-    नियमित घराच्या घरी व्यायाम करा

आहार, व्यायाम, औषधे, नियमित तपासण्या आणि शास्त्रिय माहिती या मधुमेह नियंत्रणाच्या पंचसूत्रीचे कोरोनाच्या उद्रेकात काटेकोर पालक करावे. तसेच, सोशल डिस्टसिंग, हात धुणे, मास्क वापरणे याचा वापर करावा. कोरोनाच्या संसर्गानंतर उपचारांची गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेहींनी लॉकडाऊन स्वतःसाठी कायम ठेवावा,
- डॉ. चित्तरंजन याज्ञिक, मधुमेहतज्ज्ञ

लॉकडाऊनमध्ये आपण घरात सुरक्षित असतो. पण, आता रस्त्यांवरील गर्दी वाढत असल्याने मधुमेहींनी स्वतःच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याची ही वेळ आहे. कारण, सगळ्यांनी सगळे नियम व्यवस्थित पाळले पाहिजे. तरच, प्रत्येकजण सुरक्षित राहील. 
- डॉ. शैलजा काळे, मधुमेहतज्ज्ञ

इतर आजार असलेल्या कोरोनाबाधी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण : 72 टक्के
इतर आजार नसलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाम : 28 टक्के

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image