Pune | बालकांमधील संवाद जपला तर समाजही जपला जाईल; अमिताभ गुप्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकांमधील संवाद जपला तर समाजही जपला जाईल; अमिताभ गुप्ता
बालकांमधील संवाद जपला तर समाजही जपला जाईल; अमिताभ गुप्ता

बालकांमधील संवाद जपला तर समाजही जपला जाईल; अमिताभ गुप्ता

sakal_logo
By
जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता - पालक आणि मुलांमध्ये संवाद असला पाहिजे; हा संवाद असेल तरच कुटुंबा सोबतच समाजही जपला जाईल. मुलांच्या माध्यमातूनच आपल्याला भविष्य घडवायचे आहे. पूर्वी मुलांमध्ये आणि पालकांमध्ये एका पिढीचे अंतर होते मात्र सध्याच्या युगात ते अंतर दोन पिढ्यांचे आहे, म्हणूनच पालकांनी मुलांशी मुलांसारखे होऊन त्यांचे मित्र बनले पाहिजे, अशी अपेक्षा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.

आनंदनगर सनसिटी रस्ता येथील सिंहगड रस्ता पोलीस ठाणे, येथे परिमंडळ तीन मधील सहा पोलीस ठाण्यातील एकत्रित बालस्नेही पोलीस कक्षाचे उदघाटन करण्यात आले. सिंहगड रस्ता, दत्तवाडी, अलंकार, कोथरूड, वारजे, उत्तमनगर या पोलीस ठाणे येथे बाल स्नेही पोलीस कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना मोटारीच्या धडकेने शाळकरी मुलीचा मृत्यू

कार्यक्रमास पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन, पुणेच्या संचालिका कॅरोलीन एडॉर डे बॉल्टर, परिमंडळ ३च्या उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार, गजानन टोंपे, शितल अस्तित्व सेवाभावी संस्थेच्या गायत्री कोटबागी, सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, अभिनेत्री पर्ण पेठे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पौर्णिमा गायकवाड यांनी केले. आंतरराष्ट्रीय जागतिक बालदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पोलीस कर्मचारी विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कामाच्या ठिकाणी स्नेहालय सूरु करण्यात आले. यासोबतच विधी संघर्षक बालक, तसेच ज्या बालकांवर अत्याचार झाले आहेत अशा बालकांचे समुपदेशन करण्यासाठी यासह त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. सनसिटी रस्ता येथील सिंहगड पोलिस ठाण्यात हा कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन ऋतुजा देशमुख यांनी केले तर सुनील पवार यांनी आभार मानले. गोष्ट रंग संस्थेचे महेंद्र वाळुंज यांनी सादर केलेल्या "छत्री" या गोष्टीने उपस्थित लहान मुले आनंदली.

loading image
go to top